महाराष्ट्र बातम्या

कोणता पक्ष कोणाला निवडणार विधिमंडळ नेता? उत्सुकता शिगेला

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : दिवाळी संपल्यानंतर राज्यात नवीन राजकीय घडामोडींची धुळवड सुरू होणार आहे. शिवसेना-भाजप युतीत सत्तास्थापनेचा पहिला अंक सुरू होणार असून, युतीतील घडामोडींनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची रणनीती ठरणार आहे. दुसरीकडे विधिमंडळातील नेतानिवडीसाठी सर्वपक्षीय बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस 54, तर कॉंग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील हे एकमेव निवडून आले आहेत. समाजवादी पक्षाने दोन, बहुजन विकास आघाडीने तीन, तर एमआयएमने दोन जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या विधानसभेत 13 अपक्ष आमदार असतील.

शिवसेना-भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी घडामोडी सुरू आहेत. युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, यावर रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजप तयार नसल्याचे दोन दिवसांपूर्वी प्रभारी सरोज पांडे यांनी स्पष्ट केले होते. भाजपचे अन्य नेतेही भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा करीत आहेत. या सर्व वातावरणामुळे युतीतील तिढा वाढल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हायचे असेल, तर पाठिंबा देण्याची तयारी कॉंग्रेसने दर्शविली आहे. मात्र, आम्हाला विरोधात बसण्याचा जनतेने कौल दिल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपातील तिढा सुटण्यावर अन्य राजकीय समीकरणांची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
दरम्यान, विधिमंडळ सभागृह नेता निवडण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या बैठका सुरू होणार आहेत.

भाजपचा विधिमंडळ नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचा आदित्य ठाकरे असतील. कॉंग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, याबाबतचा निर्णय दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांची चर्चा असली, तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यावर निर्णय घेणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार असल्याने राजू पाटील हेच पक्षाचे नेते असतील. समाजवादी पार्टीचे अबू आझमी, बविआचे हितेंद्र ठाकूर सभागृहनेते होण्याची शक्‍यता आहे. 

संभाव्य नेतानिवड

- भाजप - देवेंद्र फडणवीस 

- शिवसेना - आदित्य ठाकरे 

- राष्ट्रवादी कॉंग्रेस - अजित पवार/धनंजय मुंडे/जयंत पाटील 

- कॉंग्रेस - बाळासाहेब थोरात/विजय वडेट्टीवार/नाना पटोले 

- मनसे - राजू पाटील 

- समाजवादी पार्टी - अबू आसिम आझमी 

- बहुजन विकास आघाडी - हितेंद्र ठाकूर

- एमआयएम - डॉ. फारूक शाह/मौलाना मुफ्ती इस्माईल 

- प्रहार जनशक्‍ती पार्टी - बच्चू कडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : रस्त्यांतील खड्ड्यांमुळे लोक मरत आहेत, प्रशासनाला सोयरसुतक नाही- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT