महाराष्ट्र बातम्या

अजित पवार म्हणाले, 'आता चित्र लवकरच बदलेल'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विरोधी पक्षातील नेते भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात जात आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश करणारे नेते सैरभैर होतील. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे चित्र पाहायला मिळेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

पुणे मर्चंट को. ऑपरेटिव्ह बँकेच्या बुधवार पेठ शाखेचे स्थलांतर गुरुवार पेठेतील जैन मंदिर येथे झाले. या नवीन कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीतील नेते सत्ताधारी पक्षात जात असले तरी, कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत. ते कायम संपर्कात आहेत ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादीला पुन्हा भरभराटीचे दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले, भाजप-शिवसेनेत कितीही नेते प्रवेश करत असले तरी विधानसभेच्या 288 एवढ्याच जागा आहेत. त्यापेक्षा जास्त जागा लढवता येणार नाहीत, असा उपरोधिक टोला मारत पवार म्हणाले, या दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. पण युती झाली तर प्रत्येकी 144 च्या जवळपास जागा मिळतील.

आम्ही शरद पवारांसोबतच

कोणाला कुठे जायचे असेल तर त्यांना जाऊ द्या. आम्ही पक्षाचे नेते शरद पवार यांच्याबरोबर आहोत. चांगले उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्सुक आहेत. 

...तर तारेवरची कसरत होईल

भाजपचे सध्या 123 आमदार आहेत. सात-आठ अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत. त्यात परत आत्ता भाजपमध्ये प्रवेश करणारे आहेतच. नव्याने पक्षात आलेले, निष्ठावंत कार्यकर्ते यांना सामवून घेताना त्यांची तारेवरची कसरत होईल. पक्षांतर केलेले नेते सैरभैर होतील. त्यामुळे उमेदवारी जाहीर होत असताना महाराष्ट्रामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळेल, असा दावाही अजित पवार यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT