NCP rohit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

2024 नंतरच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडेच; रोहित पवारांचं सूचक विधान

जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या काळातील राजकारणाची सूत्र ही आपल्याच हाती असतील असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते तिथं जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. (politics after 2024 is our Indicative statement of Rohit Pawar regarding NCP)

राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही मात्र या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मात्र, लांबचं राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी पुढची राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट संकेतच त्यांनी दिले.

आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीचा शिकवण स्विकारुन ती आत्मसात केली आहे. 2024 पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहोत. मात्र, 2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार, यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार आहेत, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT