IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Hardik Pandya Wants GT Return: हार्दिक पांड्याच्या आयपीएलमधील ट्रेडबाबत सध्या सातत्याने चर्चा सुरू आहे. आता गुजरात टायटन्स संघात तो पुन्हा जाण्याची शक्यता आहे. याबाबत गुजरात टायटन्सने कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चाही केली आहे.
Hardik Pandya | Shubman Gill

Hardik Pandya | Shubman Gill

Sakal

Updated on

IPL 2027 Hardik Pandya Trade Marathi Update News: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) हार्दिक पांड्याच्या ट्रेडबद्दल सध्या सातत्याने चर्चा होत आहे. हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. पण त्याच्यातील आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील संबंध बिघडल्याची चर्चा आयपीएल २०२६ मध्ये झाली, त्यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indiand) त्याला ट्रेड करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले.

त्याला संघात घेण्यासाठी अनेक संघ तयार असल्याचेही समजले. याचदरम्यान आता मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पुन्हा हार्दिकला संघात घेण्याच तयार आहेत, त्याबाबत सध्याचा कर्णधार शुभमन गिलसोबत (Shubman Gill) चर्चाही झाली. मात्र एका अटीमुळे ही डिल फिस्कटण्याची शक्यता असल्याचे रिपोर्ट्स आहेत.

Hardik Pandya | Shubman Gill
Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com