Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'मी थोरातांना अलर्ट केलं होतं...' सत्यजित तांबेंवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांना सगळं माहित होतं सत्यजित तांबे प्रकरणात नवा ट्विस्ट

सकाळ डिजिटल टीम

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीत सध्या जोरदार रंगू लागली आहे. काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजत आहे याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत आधीच आपण बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. “वेगळा पर्याय होईल हे कानावर आलं होतं. त्याचवेळी मी थोरातांना अलर्ट केलं होतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. तर भाजपनेही या निवडणुकीसाठी उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे दुसरीकडे काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले आहेत अजित पवार?

"दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघा, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना आधल्या दिवशी सांगितलेलं होतं. ते म्हटले की, तुम्ही काळजी करु नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू. उद्या डॉक्टर सुधीर तांबे यांचाच फॉर्म भरला जाईल असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते" अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळ टोळीतील मुसाब शेखला अटक; शेखच्या ताब्यातून ८७८ ग्रॅम गांजा जप्त, अन्य एकजण ताब्यात

Pune Crime : पुण्यातील घरफोडीप्रकरणी सराईत गुन्हेगार २४ तासांत अटकेत

Latest Marathi News Live Update : सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारला फटकार

Pune Crime : मकोका गुन्ह्यातील फरार आरोपी करण कुंभार गजाआड

Pune Books On Wheel : ‘एनबीटी’च्या फिरत्या पुस्तक बसचे उद्‍घाटन; वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रम

SCROLL FOR NEXT