College-Students e sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांची ‘पॉलिटेक्निक’ला सर्वाधिक पसंती! प्रवेश क्षमता एक लाख अन्‌ नोंदणी १.४० लाख विद्यार्थ्यांची

राज्यातील ३२६ पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) महाविद्यालयांची प्रवेश क्षमता एक लाखांपर्यंत आहे. तरीसुद्धा यंदा दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल थेट प्रथम वर्ष अभियांत्रिकीकडेच आहे. आतापर्यंत एक लाख ४० हजार ३७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ३२६ पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) महाविद्यालयांची प्रवेश क्षमता एक लाखांपर्यंत आहे. तरीसुद्धा यंदा दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल थेट प्रथम वर्ष अभियांत्रिकीकडेच आहे. आतापर्यंत एक लाख ४० हजार ३७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दहावीनंतर बारावीपर्यंत दोन वर्षे शिकूनही पुढे अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘सीईटी’ द्यावी लागते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी निकाल लागताच तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घ्यायला पसंती दर्शवली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून लगेच नोकरी लागेल हा त्यामागील हेतू आहे. बारावीनंतर पुन्हा आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसल्याचेही त्यामागे कारण आहे. आता ६० ते ८५ टक्के गुण मिळविलेले इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी देखील ‘तंत्रनिकेतन’साठी नोंदणी केली आहे.

कोरोनानंतर कॉम्प्युटर, माहिती तंत्रज्ञान (आयटी) व इलेक्ट्रॉनिकला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती राहिली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी त्यांची प्रवेश क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘तंत्रनिकेतन’साठी नोंदणी केली आहे. शुक्रवार (ता. ३०) प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत होती, शेवटच्या दिवशी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी केली, असे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ठळक बाबी...

  • - राज्यात तंत्रनिकेतन महाविद्यालयांची प्रवेश क्षमता एक लाख, पण नोंदणी १.४० हजार विद्यार्थ्यांची

  • - कागदपत्रे अपुरी असल्याने १५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीसह प्रवेश निश्चितीसाठी अडचणी

  • - दाखले मिळण्यासाठी अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मिळणार मुदतवाढ

  • - राज्यात पॉलिटेक्निकची ३२६ महाविद्यालये, अनेकांचे प्रवेश क्षमता वाढीसाठी प्रस्ताव

  • - दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संगणक, आयटी व इलेक्ट्रॉनिक अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती

तंत्रनिकेतन प्रवेशाची सद्य:स्थिती

  • एकूण महाविद्यालये

  • ३२६

  • प्रवेश क्षमता

  • ९९.६३ लाख

  • आतापर्यंत नोंदणी

  • १,४०,२७०

सेतू सुविधा बंदमुळे मुदतवाढीची नामुष्की

सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमधील सेतू सुविधा केंद्रांची मुदत एप्रिल-मे महिन्यात संपली आहे. त्यानंतर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह विविध लाभार्थींना त्यांच्याच गावात दाखले देण्याची मोहीम राबविली. तरीपण, अनेकांना दाखले मिळालेले नाहीत. दाखले मिळण्याचा कालावधी देखील १० ते ३० दिवसांचा असल्याने अनेकांना प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची नामुष्की सर्वच विभागांवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Gift: टीव्ही 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार; एसी आणि गाड्यांच्या किमतीही कमी होणार, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प, ठाण्यात प्रवासी रुळावर उतरले

Kolhapur Highway Flood : कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर पाणी, कोकणात जाणारे दोन घाट बंद; अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

वोटिंग मशिन चुकीचे, महाग अन् वादग्रस्त; वॉटरमार्क पेपरवर मतदान घेणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

'माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना जिवे मारण्याची धमकी', कीर्तनकार भंडारेंच्या व्हिडिओने राज्यभर खळबळ..

SCROLL FOR NEXT