Pooja Khedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या आईची पिंपरी चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; 'हे' कारण ठरलं महत्त्वाचं...

Manorama Khedkar's company in Pimpri Chinchwad will be confiscated: पूजा खेडकर हिने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंगत्वाचा प्रमाणपत्र घेण्यासाठी याच कंपनीचा पत्ता आपलं निवासस्थान म्हणून दाखवलं होतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका खेडकर कुटुंबियांच्या कर थकविणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाईक करण्याची शक्यता आहे.

संतोष कानडे

पुणेः मागच्या दोन आठवड्यांपासून पूजा खेडकर हे प्रकरण राज्यसह देशभरामध्ये गाजत आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढे आल्याने तिची चौकशी होत आहे. त्यामुळे तिचा प्रशिक्षण कालावधी थांबवण्यात आलेलं आहे.

पूजाच्या कारनाम्यांमुळे तिच्या आई-वडिलांचे गैरप्रकार उघड आहेत. जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजाच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र काढताना जो पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर तिच्या आईची कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी महानगरपालिकेच्या रडावर असून कंपनी जप्त होणार असल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबा नगर, तळवडे येथे असलेली थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक ही कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा २ लाख 77 हजार इतकं कर मागील दोन वर्षापासून बुडविला आहे. तसेच थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खेडकर कुटुंबीयांनी रेड झोनमध्ये उभारली असल्याने खेडकर कुटुंबियांची ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

पूजा खेडकर हिने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंगत्वाचा प्रमाणपत्र घेण्यासाठी याच कंपनीचा पत्ता आपलं निवासस्थान म्हणून दाखवलं होतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका खेडकर कुटुंबियांच्या कर थकविणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाईक करण्याची शक्यता आहे. तसेच ही कंपनी रेड झोनमध्ये उभारली असल्याने या कंपनीवर पिंपरी चिंचवड महापालिका हातोडाही चालू शकते. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला गुरुवारी अटक करण्यात आली. पौंड पोलिसांनी मनोरमाला रायगडमधून अटक केल्याची माहिती मिळत आहेत. बंदूक रोखून एका शेतकऱ्याला धमकवल्याचा आरोप मनोरमावर होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मनोरमा फरार होती.

मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी आपला मोबाईल फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. महाडच्या हिरकणवाडी भागात पार्वती हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसली होती. मनोरमाचा पती दिलीप खेडकर हादेखील अद्याप फरार आहे. शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी दोन बाऊन्सर, दोन महिलांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT