Ramdas Kadam sakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar : ''...तेव्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे होते'', दिलीप खेडकरांवरुन होणाऱ्या आरोपांना रामदास कदमांचं उत्तर

Ramdas Kadam : रामदास कदम म्हणाले की, दिलीप खेडकर आणि माझ्याविषयी प्रसार माध्यमातून ज्या बातम्या पसरत आहेत, त्या माझी बदनामी करणाऱ्या आहेत. माझ्याविरोधात कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना बातम्या पासरावयच्या हे चुकीचे आहे.

संतोष कानडे

Dilip Khedkar : पूजा खेडकर हे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. पूजाचं आयएएस कालावधीतलं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं असून यूपीएससीने तिच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पूजामुळे तिच्या कुटुंबाचे जुने कारनामे उघड होऊ लागले आहेत. तिचे वडील दिलीप खेडकरवर अनेक प्रकरणांची चौकशी असताना रामदास कदम यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करुन खेडकरला पोस्टिंग दिल्याचा आरोप तानाजी गंभीरे यांनी केला आहे.

प्रसिद्ध वकील तानाजी गंभीरे यांनी दिलीप खेडकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. त्याचबरोबर वकील गंभीरे यांनी कोकणातील दोन मंत्र्यांची नावे घेऊन खेडकरच्या बदलीसाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे. त्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी उत्तर दिलं.

रामदास कदम म्हणाले की, दिलीप खेडकर आणि माझ्याविषयी प्रसार माध्यमातून ज्या बातम्या पसरत आहेत, त्या माझी बदनामी करणाऱ्या आहेत. माझ्याविरोधात कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना बातम्या पासरावयच्या हे चुकीचे आहे.

मी आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता राहिलो आहे, पण कधीही डाग लावून घेतलेला नाही. मुळात मंत्र्यांचा आणि बदलीचा काही संबंध येत नाही, हे सचिवांचे काम असते, असं रामदास कदम म्हणाले.

गंभीरे आणि संजय कदम यांनी आठ दिवसांच्या आत माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दाव्याला सामोरे जावे, अशा इशारा रामदास कदम यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, दिलीप खेडकरची बदली 2022 ला झाली तेव्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, मग हा प्रश्न त्यांनाच विचारायला हवा. यातून फक्त एकनाथ शिंदे यांच्या जवळ असलेल्या माणसांची बदनामी कशी होईल हेच बघितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT