Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पुण्यासह राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; आज 'या' जिल्ह्यांना इशारा

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात काल गणेशोत्सवाच्या सोहळा पार पडला. घरोघरी गणरायाचे आगमन झाले. राज्यभरात गणरायाच्या आगमनाला अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.

तर आगामी दोन दिवसांमध्ये पुण्यासह राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर आज (बुधवारी) विदर्भात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण परिसरात तुरळक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यभरात आगामी तीन ते चार दिवसात राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर उद्यापासून (२१ सप्टेंबर) पुण्यासह घाटमाथ्यावर आणि इतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT