Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात पावसाचे पुनरागमन? आज 'या' भागांत पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमण कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.

राज्यात कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता आहे.

राज्यात लवकरच पाऊस कमबॅक करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. तर हवामान खात्याने लवरकरच राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT