Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: मुंबईत पावसाच्या तुरळक सरी, विदर्भाला यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

अशातच आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 1-2 दिवस मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतही गुरुवारपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमण कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.

राज्यात लवकरच पाऊस कमबॅक करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. तर हवामान खात्याने लवरकरच राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT