उदय सामंत sakal
महाराष्ट्र बातम्या

'प्राध्यापकांच्या जागा भरणार' : उदय सामंत

‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून तज्ज्ञ प्राचार्य, प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : ‘पारंपरिक शिक्षण पद्धतीसोबतच आगामी काळात ‘व्हर्च्युअल क्लासरूम' ची (Virtual classroom) संकल्पना पुढे आणली जाणार आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यातील पाच विद्यापीठांत दूरस्थ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून तज्ज्ञ प्राचार्य, प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. (post professors will appointed soon uday samant)

पारंपरिक शिक्षण पद्धतीवरच विश्वास आहेच. कोरोनामुळे ऑनलाइनचा पर्याय समोर आला. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासोबतच व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना पुढे आणली जाणार आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, गोंडवाना, नागपूर येथील विद्यापीठांत दूरस्थ केंद्रे सुरू केले जाणार आहे, असे सावंत म्हणाले.

प्राध्यापकांच्या जागा भरणार

राज्यात प्राध्यापकांच्या चार हजार ६०० जागा भरण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी कोरोनापूर्वी एक हजार ६०० जागा भरल्या आहेत. त्यानंतर तीन हजार ७४ प्राध्यापकांच्या जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठविला आहे. कोरोनामुळे त्यावर निर्णय झाला नाही. कोरोना लाट कमी झाल्यानंतर या जागा भरल्या जातील, असे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT