metro
metro 
महाराष्ट्र

मेट्रोच्या बांधकामावरील स्थगिती उठवली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पुणे मेट्रोच्या मार्गातील अडथळा मुंबई उच्च न्यायालयाने दूर केला आहे. डॉ. सालीम अली अभयारण्य आणि कल्याणीनगर येथून जाणाऱ्या मेट्रोच्या बांधकामावरील स्थगिती उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २०) उठवली. 

पुणे मेट्रोने मार्गातील बदलाविषयी अधिसूचना काढली नसतानाही बांधकाम सुरू असल्याबद्दल आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळण्यात आल्याने पुणे मेट्रो प्रशासनाला दिलासा मिळाला. पुण्यातील आगाखान पॅलेससमोरून मेट्रो नेता येणार नसल्याने हा मार्ग कल्याणीनगर येथून वळवण्याचा निर्णय घेतला होता.  

मेट्रोविरोधात यापूर्वी दाखल झालेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या. त्यानंतर या परिसरात मेट्रोचे काम सुरू झाले होते. मेट्रोच्या बदललेल्या मार्गाची अधिसूचना प्रसिद्ध झाली नसल्याचे कारण देत पुन्हा याचिका करण्यात आली होती. मागील सुनावणीत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने पुणे मेट्रो प्रशासनाकडे विचारणा केली होती. त्यावर संबंधित अधिसूचना प्रसिद्ध झाली नसल्याची माहिती महामेट्रोच्या वतीने देण्यात आली होती. त्यामुळे या बांधकामाला उच्च न्यायालयाने मनाई केली होती. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मेट्रो प्रशासनाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बांधकामावरील मनाई  मागे घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT