potholes on samruddhi Mahamarg Amravati Lohegaon bridge cracked  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg: उद्घाटनानंतर 14 महिन्यातच ‘समृद्धी’वर जीवघेणा खड्डा! बांधकामाच्‍या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Samruddhi Mahamarg: नागपूर ते मुंबई दरम्यानचे सुमारे 800 किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा तासांत कापणाऱ्या 'समृद्धी महामार्गा'च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

Samruddhi Mahamarg (Marathi News): नागपूर ते मुंबई दरम्यानचे सुमारे 800 किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा तासांत कापणाऱ्या 'समृद्धी महामार्गा'च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, एवढ्या कमी कालावधीत रस्ते अपघात आणि अनेकांचे बळी गेल्याने या रस्त्याला आता 'मृत्यूचा रस्ता' म्हटले जात आहे.

potholes on samruddhi Mahamarg Amravati Lohegaon bridge cracked

यातच आता नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावनजीक पुलाला खड्डा पडला आहे. महामार्गाजवळून शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याची तक्रार करण्यात येत होती. (potholes on samruddhi Mahamarg Amravati Lohegaon bridge cracked)

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग 55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. मात्र, उद्घाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

महामार्गावरील प्रवासी सुविधांचा अभाव हे देखील समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांचे कारण मानले जात आहे. सुविधांअभावी वाहनचालकांना सतत लांब पल्ल्याच्या गाड्या चालवाव्या लागत आहेत.

सतत वाहन चालवल्यामुळे वाहनचालकांना हायवेच्या संमोहनाचा त्रास होत असून, लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंगसारख्या चुका होत आहेत. त्यामुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT