nitin raut nitin raut
महाराष्ट्र बातम्या

मोठा निर्णय! तीन महिने वीजतोडणी थांबवण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने थांबवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा (Farmer) वीज पुरवठा पूर्ववत होणार असल्याची घोषणा, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली आहे. बँकेचे कर्ज त्यामुळे महावितरणची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने तात्पुरती थांबवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Power Supply Of Farmers Will Be Restored Says Nitin Raut)

राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत बोलताना सांगितले आहे. त्याशिवाय वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीजसुद्धा पुर्ववत केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांच्या वीज तोडणी हा सभागृहातील मोठा चर्चेचा विषय होता त्यात उर्जामंत्र्यांनी पिक हातात येईपर्यंत म्हणजेच पढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नसून, वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांचादेखील वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाणार असल्याची घोषणा उर्जामंत्री राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या घोषणेनंतर शतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्याचे उदिष्ट समोर ठेवून तसेच या विषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांचा पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत म्हणजेच आगामी तीन महिने कृषि वीज ग्राहकांची वीज तोडणी तात्पूर्त्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT