Lok Sabha Election Results Sangli Police esakal
महाराष्ट्र बातम्या

रात्री दहापर्यंतच प्रचारसभांना परवानगी! सोलापूर जिल्ह्यात 10,000 पोलिसांचा बंदोबस्त; केंद्रीय सुरक्षा बलाच्या 13 तुकड्या दाखल; ढाबे-हॉटेलमधील पार्ट्यांवर ‘एक्साईज’चे लक्ष

४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी, निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन होवू नये, आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच पालन करावे, यासाठी शहर- जिल्ह्यात तब्बल दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपून आता अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी, निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन होवू नये, आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच पालन करावे, यासाठी शहर- जिल्ह्यात तब्बल दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

विधानसभेची आचारसंहिता सुरु झाल्यापासून जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही नांदणी, वाघदरी, मरवडे येथे नाकाबंदी आहे. त्याठिकाणी दररोज वाहनांची तपासणी केली जात असून मागील १५ दिवसांत जवळपास ५५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबरपासून गावागोवी प्रचाराच्या तोफा धडाडणार असून त्यावेळी उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यावर पोलिसांचे लक्ष असणार आहे.

मोठ्या सभांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असून रात्री दहानंतर प्रचारसभांना परवानगी नसणार आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात तीन हजार ७२३ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात केंद्रीय सुरक्षा बलाची तुकडी पाठविली जाणार आहे. मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल, याची संपूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे. सध्या पोलिसांचे पथसंचलन देखील सुरु आहे.

शहरातील पोलिस बंदोबस्त

  • मतदारसंघ

  • २.४०

  • पोलिस अधिकारी-अंमलदार

  • १,४४४

  • केंद्रीय बलाच्या तुकड्या

  • होमगार्ड

  • १,१००

---------------------

ग्रामीणमधील पोलिस बंदोबस्त

  • मतदारसंघ

  • ८.६०

  • पोलिस अंमलदार-अधिकारी

  • ६,०००

  • केंद्रीय बलाच्या तुकड्या

  • १०

  • होमगार्ड

  • १,५००

नियमांचे सर्वांनीच तंतोतंत पालन करावे हीच अपेक्षा

रात्री दहा वाजेपर्यंत प्रचारासाठी परवानगी असेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन होईल, यादृष्टीने पोलिसांचे नियोजन आहे. दोन गटात, समाजात किंवा धर्म-जातीत तेढ निर्माण होईल, असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

ढाबे-हॉटेलमधील पार्ट्यांवर ‘एक्साईज’चे लक्ष

निवडणूक काळात हॉटेल, ढाब्यांवर कार्यकर्त्यांच्या पार्ट्या रंगतात. हॉटेल, ढाब्यांवर विनापरवाना मद्यपान करण्यावर निर्बंध आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास अटक होऊन न्यायालयातून त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दहा भरारी पथकांच्या माध्यमातून अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20 Rankings: टी-२० क्रमवारीत भारताचे वर्चस्व! अभिषेक–वरुण चमकले, सूर्यकुमारचे नेतृत्व अव्वल

Dev Deepawali 2025 : वाराणसीत देव दीपावलीचे अद्भुत दृश्य! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला पहिला दिवा

Latest Marathi Live Update News: आयटी दांपत्य फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई? आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

WPL 2026 Retention : वर्ल्ड कपची स्टार दीप्ती शर्मा संघाबाहेर; हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनासह जेमिमाबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT