Pradeep Kurulkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकरचा लॅपटॉप देताना घातला घोळ... हनीट्रॅप प्रकरणात DRDO कडून मोठी चूक

Sandip Kapde

Pradeep Kurulkar: पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली  डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पुण्यातील डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या प्रयोगशाळेचे संचालक कुरुलकर यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३ मे रोजी अटक केली होती.

दरम्यान चौकशीदरम्यान डीआरडीओकडून मोठी चूक झाली आहे. DRDO ने एटीएसला चुकीच्या माणसाचा लॅपटॉप तपासासाठी दिला. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचा लॅपटॉप तपासणी साठी मागितला होता. तर  DRDO ने कुरुलकर यांचा लॅपटॉप देण्याऐवजी चुकीच्या माणसाचा लॅपटॉप दिला. DRDO ची ही चूक एटीएसने लक्षात आणून दिली

पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर यांना चार मे रोजी अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची कोठडी २५ जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती.

दरम्यान, तपासात कुरुलकरांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएस न्यायालयाकडे केली.

न्यायालयाने एटीएसला कुरुलकर प्रकरणात पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणीतील फरक स्पष्ट करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT