Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'शरद पवार यांच्याशी माझा आजही फोनवर संपर्क', अजित पवार गटाच्या नेत्याच्या दाव्याने भुवया उंचावल्या

शरद पवार आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत, माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते असं या नेत्याने म्हटलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपुर्वी मोठी फुट पडली. अजित पवार आणि इतर 8 नेत्यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली. पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. शरद पवारांनी आपली भुमिका अजित पवार गटाच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. पण शरद पवार आपल्या मतावर ठाम होते.

दरम्यान राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्याच्या चर्चा वारंवार सुरू असतात. अशातच अजित पवार गटासोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणं होतं. मी त्यांच्या संपर्कात आहे', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पक्ष फुटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते फुट पडल्यानंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अमरावतीमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्यासोबत आलो होतो. आज अजित पवारांसोबत आलो आहे. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी येथे आलो आहे. अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरंच मी इकडे आलो? की शरद पवारांनी मला पाठवले का? शरद पवार साहेब यांच्याबद्दल असलेला आदर आजही माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असंही पटेल पुढे म्हणाले आहेत.

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, 'शरद पवारांनी मला 1978 साली बोलवून घेतलं. तेव्हापासून मी त्यांच्यासोबतच आहे. त्यांचे आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत. माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणं होत असतं, असा पटेल यांनी म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्याने राजकी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT