Bacchu Kadu esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: बच्चू कडू नाराज! थोपटले शिंदे-फडणवीसांविरोधात दंड; आता लढणार...

आमदार बच्चू कडू पुन्हा नाराज

रुपेश नामदास

Bacchu Kadu: माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू दिवसेंदिवस शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज होताना दिसत आहेत. जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. मात्र अजून ही त्यांना सरकारमध्ये मंत्री पदाची संधी दिली नाही.

दरम्यान आता बच्चू कडू यांनी पुन्हा नाराजी बोलून दाखवली आहे. राज्यात पदवीधर व शिक्षक निवडणुका लागल्या आहेत. मात्र या निवडणुकीची भाजप - शिंदे गटाने दखल न घेतल्याने ही निवणुक प्रहार स्वतंत्र लढणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत प्रहार संघटना व मेस्टा संघटना शिक्षक व पदवीधर राज्यातील पाचही मतदार संघात लढणार असल्याचे आमदार कडू यांनी जाहीर केले आहे. आमदार बच्चू कडू आज माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक भाजप-शिंदे गट एकत्र लढणार होतो मात्र कोणीच दखल घेतली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रस्तावाची दखल घेतली नसल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तर ते म्हणाले आम्ही या निवडणूकीसाठी दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्रहार संघटना आणि मेस्टा संघटना शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही जागा लढवणार आहोत. बच्चू कडू यांनी उमेदवार देखील जाहीर केले आहेत.

हेही वाचा-द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT