महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांच्याकडून नारायण राणेंचा 'चिंधीचोर'असा उल्लेख; कारण...

प्रकाश आंबेडकर यांनी भाकीत केलं होतं की निवडणुकीपुर्वी देशातील काही धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जाऊ शकतं.

Manoj Bhalerao

Prakash Ambedkar Criticized Narayan Rane:सध्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख्य प्रकाश आंबेडकर आणि नारायण राणे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावर नारायण राणेंनी टीका केली होती. नारायण राणेंच्या या टीकेला उत्तर देताना आंबेडकरांनी नारायण राणेंचा उल्लेख 'चिंधीचोर' असा केला. प्रकाश आंबेडकर यांनी भाकीत केलं होतं की निवडणुकीपुर्वी देशातील काही धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जाऊ शकतं.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की वाराणासीचं ज्ञानव्यापी मशीद, अयोध्येचं रामजन्मभूमी मंदिर, दिल्लीतील अक्षरधाम मंदिर यांसारख्या धार्मिक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर हल्ला केला जाऊ शकतो. त्यांनी ही ठिकाणं टार्गेट केली जाऊ शकतात अशी शंका उपस्थित केली. यावर नारायण राणेंनी टीका करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं असे वक्तव्य केले होते.

नारायण राणे म्हणाले की,"धार्मिक स्थळावर हल्ला होणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांना कुठून मिळाली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं."त्यानंतर नारायण राणेंच्या या वक्तव्याला प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. यावेली दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी नाराय़ण राणेंचा उल्लेख 'चिंधीचोर'असा केला.

प्रकाश आंबेडकर आणि नारायण राणे यांच्यातील वाद आणखी वाढू शकतो. प्रकाश आंबेडकर यांनी 'चिंधीचोर' असा उल्लेख केल्यानंतर नारायण राणेंची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT