Prakash Ambedkar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर प्रकाश आंबेडकरांनी बोलणं टाळलं! म्हणाले, 'आयाराम गयारामचं जे राजकारण...'

Prakash Ambedkar on Vasant More: मनसे सोडल्यानंतर वंतिचसोबत गेलेल्या वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलणार असल्याची माहिती दिली. त्यावरती प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेतला. मनसे सोडल्यानंतर वंचितसोबत गेलेल्या वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलणार असल्याची माहिती दिली. काल त्यांनी मातोश्रीवरती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ९ जुलै रोजी त्यांचा ठाकरे गटात पक्षपवेश होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशावर आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोणत्याही आयाराम गयारामचं जे राजकारण आहे, त्यांच्यावरती मी बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की, प्रत्येकाने आपला-आपला मार्ग ठरवायचा असतो, असं म्हणत वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर आंबेडरांनी जास्त बोलणं टाळलं आहे.

आज प्रकाश आंबेडकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यावर स्टे देण्यात यावा आदी मागण्यांसाठी ही भेट घेतल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

वसंत मोरे ठाकरे गटात करणार पक्षप्रवेश

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेतला. मनसे सोडल्यानंतर वंतिचसोबत गेलेल्या वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलणार असल्याची माहिती दिली. काल त्यांनी मातोश्रीवरती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ९ जुलै रोजी त्यांचा ठाकरे गटात पक्षपवेश होणार असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील मानाच्या तिन्ही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT