Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी पुन्हा एकदा जाहीर इच्छा प्रकट केली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत जागावाटपावरून धुसफूस सुरू झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी पुन्हा एकदा जाहीर इच्छा प्रकट केली आहे.

मात्र, महाविकास आघाडीत येण्याबरोबरच आघाडीतील चारही पक्षांना प्रत्येकी १२ अशा समान जागांचे वाटपही व्हावे, असे सूत्र देत लोकसभेच्या १२ जागा महाविकास आघाडीत मिळाव्यात असा प्रस्ताव त्यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवला आहे. लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप समान झाल्यास सत्तेत समान भागीदार या सूत्रामुळे आघाडीतील वादही आपोआप मिटतील, असा दावाही त्यांनी केला.

ॲड. आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT