Devendra Fadnavis-Prakash Ambedkar google
महाराष्ट्र बातम्या

स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी मलिकांचं प्रकरण काढलं - आंबेडकर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप (Devendra Fadnavis allegations on nawab malik) केले आहेत. मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ''स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचं प्रकरण काढलं'' असं आंबेडकर म्हणाले.

''देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही. स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचं प्रकरण काढलं. आपल्यावर शेकाल्या जाते त्यावेळी त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची. आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सर्व केलं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कारवाई का केली नाही?'' असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.

आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणं निकाली काढावे, असंही आंबेडकर म्हणाले.

फडणवीसांचे नेमके आरोप काय?

''नवाब मलिकांनी कुर्ला येथे कवडीमोल भावात जमीन खरेदी केली आहे. ही जमीन सरदारवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून खरेदी केली आहे. खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे, सलीम पटेलचे दाऊदची बहीण हसीना पारकरचा महत्वाचा माणूस होता. मुंबईच्या हत्यारांकडून मलिकांनी जमीन का खरेदी केली?'' असा सवाल मलिकांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, मलिकांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कुठल्याही बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपीकडून मी जमीन खरेदी केलेली नाही. मी केलेला व्यवहार अचूक आहे, असं स्पष्टीकरण मलिक यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT