Prakash Ambedkar on MNS Chief raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : तर मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस... प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान, राज ठाकरेंवर टाडा लावण्याचीही केली मागणी

Prakash Ambedkar On Raj Thackeray : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सरकारने जेलमध्ये टाकले पाहिजे अशी मागणी केली आहे.

रोहित कणसे

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टाडा कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंनी शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रणाणात आहे आणि मग ते शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यावर सरकारचा इतका पैसा खर्च होतो की शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे पैसा नाहीये, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते.

राज ठाकरेंच्या या वक्तव्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, अशा व्यक्तींवर सरळ टाडा-पोटा लागला पाहिजे, हे ब्रेक अप द नेशन... सरकारने मागे पुढे न पाहाता सरळ आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातील माणूस यूपी, ओडिसा, पश्चिम बंगालमध्ये आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे. गुजरातमध्ये देखील आहे. त्यांचं काय करायचं? त्यामुळे हे वक्तव्य समाज दुभंगण्याचं वक्तव्य आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे UAPA आणि नॅशनल सेक्युरिटी अॅक्ट लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी. उद्या उठाव झाला आणि त्या राज्यातील लोकांनी तुम जाव, आणि इथं आपण तुम जाव म्हटलं तर काय होणारेय? गोंधळ उडेल असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तर मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस...

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल असे आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT