NCP News  
महाराष्ट्र बातम्या

NCP News : "राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपच्या गळाला", राजकारणात खळबळ माजवणार मोठं वक्तव्य!

Sandip Kapde

NCP News : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक खळबळ माजवणारे प्रकरणे घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये वाढ झाली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष सुरू आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना आलेली ईडी नोटीस देखील चर्चेत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठी टीका होत आहे. शिंदे गटाचे नेते देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केलेल वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. तसेच त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांनीही आंबेडकरांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. त्यांचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये जयंत पाटील आहेत. त्यांच्यासारखे अनेक नेते आहेत. तुम्ही भाजपमध्ये या नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेट त्यांना दिला तर पाटील भाजपमध्ये जायला कधीही उत्सुक असतील. जेलमध्ये जाण्यास उत्सुक नसतील.

सध्या ईडीच्या कारवाईत राजकीय दबाव कुणावर असेल तर तो राष्ट्रवादी पक्ष आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : हृदयद्रावक घटना ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या 'दादा स्टाइल'नं जिंकलं मन, बारामतीला दिलं मोठं गिफ्ट, अन् कंठ दाटला..

NH48 Wall Collapse : पुणे-बंगळूर महामार्गाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी! दिल्लीच्या केंद्रीय पथकाकडून निपाणीत अत्याधुनिक यंत्रांनी तपासणी, मोठे अधिकारी अडचणीत?

Latest Marathi News Live Update : माझी डिग्री खरी, सगळी कागदपत्रं दाखवतो, मोदींनीही त्यांची डिग्री दाखवावी; अभिजीत दिपकेंचं थेट चॅलेंज

Monsoon Fever: पावसाळ्यातील 'हा' ताप साधा समजू नका! डेंग्यू-टायफॉईडची सुरुवात तर नाही ना? जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं अन् बचावाचे उपाय

SCROLL FOR NEXT