Prakash Ambedkar On Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: "मनोज जरांगेंनी 288 जागा लढवाव्या, तेव्हाच..."; प्रकाश आंबेडकरांनी काय दिला राजकीय सल्ला?

Prakash Ambedkar On Manoj Jarange: मराठा ओबीसी वादावर बोलताना, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, "हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू असताना सामंजस्याची चर्चा झाली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. आता मात्र आगीत तेल पडले आहे."

Sandip Kapde

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगरात आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र, अजून मुख्यमंत्र्यांचे पत्र आलेले नाही आणि त्यांनी ते कधी पाठवणार आहेत हे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.

तर समाजाला न्याय मिळेल

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "निवडणूक लढवणार अस मनोज जरांगे म्हणत आहेत त्यांनी २८८ जागा लढवाव्यात ही आमची अपेक्षा आहे. लोकसभेत गरीब मराठा समाजाने श्रीमंत खासदारांना मतदान केले त्यामुळे हे खासदार निवडून आले. जरांगेनी गरीब उमेदवार उभा केले तर समाजाला न्याय मिळेल."

मराठा ओबीसी वादावर भाष्य

मराठा ओबीसी वादावर बोलताना, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, "हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू असताना सामंजस्याची चर्चा झाली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. आता मात्र आगीत तेल पडले आहे."

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सर्व राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेत आहेत का, हे विचारले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी दोन तीन दिवसात राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेतली असल्याचे आंबेडकर म्हणाले.

विधान परिषद निवडणूक

विधान परिषद निवडणुकीत मत फुटल्याचे खापर काँग्रेसवर फोडले जात आहे. ज्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केले त्यांच्यावर काय कारवाई होणार हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

विशाळगडावरील अतिक्रमण

विशाळगडावर अतिक्रम झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. "त्या ठिकाणी जे घडलं, भीडे यांच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातली अशी आमची माहिती आहे. जाणून बुजून त्या ठिकाणच्या लोकांना मारहाण करण्यात आली. सरकारने यांची चौकशी करावी आणि त्यावर तोडगा काढावा," अशी विनंती त्यांनी केली.

अजित पवार आणि तिसरी आघाडी

राजकीय वर्तुळात अजित पवार तिसरी आघाडी उघडणार आणि प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयएमला सोबत घेणार अशी चर्चा आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "यामध्ये तथ्य आहे असं मी मानत नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात. त्यापैकी हा एक डावपेच असेल. भविष्यात त्यांचा प्रस्ताव आल्यावर बघू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आम्ही बंगालच्या जनतेचे अत्यंत ऋणी आहोत, ममता बॅनर्जींनी मानले मतदारांचे आभार

Satana Principal Felicitation: मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांचे कार्य प्रेरणादायी, भावी पिढीसाठी आदर्श - ॲड. नितीन ठाकरे

Human-Leopard Conflict: कोटमदरा येथे मानवी-बिबट व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती कार्यशाळा

Mothers Day Event: एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या मदर्स डे सोहळ्यात ‘सुपर मॉम’ सन्मान

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

SCROLL FOR NEXT