Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

नार्वेकरांनी ठाम रहायला हवं, सुप्रीम कोर्ट त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतंय; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसात याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल सुणावणार आहेत.

रोहित कणसे

शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसात याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल सुणावणार आहेत. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यानी आमदार अपात्रता सुनावणीबद्दल मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊ पाहत आहे. म्हणून नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे की मी निर्णय देणार नाही जेव्हा द्यायचा तेव्हा मी देईल असे आंबेडकर म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या खाली नाहीत, कायद्याचे राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे. राहुल नार्वेकर निर्णय देत नाहीत हे चुकीचं आहे, हे मी मान्य करतो. पण राहुल नार्वेकर स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालायाच्या खाली नाहीत. तेव्हा सर्वोच्च न्यायालय जे स्पीकरला स्वतः ताब्यात घ्यायला बघतंय तेव्हा स्पीकर म्हणून राहुल नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे, मी निर्णय देणार नाही, मला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा देईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

निकाल कधी लागणार?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सध्या सुरु आहे. बुधवारी निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. तसेच सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचीही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT