Prakash Ambedkar said about Sharad Pawar after vba Thackeray group alliance
Prakash Ambedkar said about Sharad Pawar after vba Thackeray group alliance esakal
महाराष्ट्र

Prakash Ambedkar :शरद पवारांशी शेतातील भांडणे नाहीत, आंबेडकर आणि ठाकरे युतीत चर्चा राष्ट्रवादीची

सकाळ डिजिटल टीम

अखेर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अखेर वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांची युती केवळ ठाकरे गटाशी माविआशी नाही. असे स्पष्ट करताना राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी शेतातील भांडणे नाहीत असेदेखील स्पष्ट केलं.

पवारांसोबत शेतातलं भांडण नाही, मुद्यांच भांडण आहे. असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यापूर्वीही अनेकवेळा आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत असे वक्तव्य केलं आहे.

Shivsena-VBA Alliance: मोठी बातमी! ठाकरे गट अन् वंचितच्या युतीची घोषणा

उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको, असं आबेंडकर यांनी म्हटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दरम्यान, आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं.

काय म्हणाले आंबेडकर?

निवडणुकीमध्ये एक बदलाच राजकारण सुरु झालं. गेली अनेवर्ष उपेक्षीतांच राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून सर्व प्रयत्न करण्यासाठी आम्ही चळवळ सुरु केली. जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे. पण उमेदवारी देणं हे पक्षाच्या हातामध्ये आहे. राज्यात मुद्याच राजकारण बाजूला पडलयं.

शरद पवारांची मी आज प्रतिक्रिया वाचली. आमचं दोघांच भांडण जुन आहे. शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण नाही. दिशेच भांडण नाही. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आमच्या युतीला स्विकारेल अशी अपेक्षा.

Sharad Pawar : मी असल्या भानगडीत पडत नाही; ठाकरे-आंबेडकर युतीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

युतीवर काय होती शरद पवारांची भूमिका?

शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी, मला याबाबत माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे या युतीबाबत पवारांची समहती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: घाटकोपर होर्डिंगखाली अजूनही 30-40 लोक अडकल्याची शक्यता; 46 तासानंतरही बचावकार्य सुरु

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

SCROLL FOR NEXT