Prakash Ambedkar: मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी रास्त पण... आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट!  sakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी रास्त पण... आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट!

Maratha Reservation: मनोज जरांगे-फडणवीस वाद फसविणारा, ओबीसी समाजाला पन्नास टक्के जागांवर उमेदवारी द्या

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil latest Update: आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाला राजकीय ओळख निर्माण करावी लागेल. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाद फसविणारा आहे.

राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाला पन्नास टक्के जागांवर उमेदवारी द्यावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. २८) व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ॲड. आंबेडकर यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, अविनाश भोसीकर, रमेश बारसकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, प्रहारचे डॉ. शहाजी चंदनशिवे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सहसचिव मोहन बनसोडे आदी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आरक्षणावरून सुरू असलेला जरांगे-फडणवीस वाद हा फसविणारा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर लढणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ; मात्र त्या पक्षाने ओबीसी समाजाला पन्नास टक्के उमेदवारी दिली पाहिजे. ओबीसींचे शंभर आमदार निवडून आणण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तानाजी बनसोडे यांनी आभार मानले.

जरांगेंचा मुद्दा रास्त, पण मांडणी चुकली

भूम शहरामधील गोलाई येथे आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या समाजकारण व राजकारण बाजूला राहून विघटन होण्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहेत. राजकीय भांडणे आता सामाजिक भांडणे होऊ लागली आहेत.

मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत मुद्दा मांडला असून तो रास्त आहे. पण, मांडणी चुकलेली आहे. मराठ्यांवरती ही परिस्थिती निजामी मराठ्यांनी म्हणजेच श्रीमंत मराठ्यांनी आणली. निजामी मराठ्यांमुळेच आज मराठा समाज विकलांग होत आहे.

सत्तेमध्ये असलेल्या अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे व फडणवीस यांना शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, याचा कायदासुद्धा करता आला नसल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT