Maha Vikas Aghadi esakal
महाराष्ट्र बातम्या

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीची वज्रमुठ होणार घट्ट?; बडा राजकीय पक्ष मविआमध्ये दाखल होणार?

रुपेश नामदास

कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे. राज्यात महाविकास आघाडीतील पक्षानी बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना अजून एका वर्षा पेक्षा जास्त अवधी असताना आताच मविआमध्ये जागा वाटपावर चर्चा चालू आहे.

तर महाविकास आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी आघाडीतील नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीची ताकत आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीची या आठवड्यात मुंबईत बैठक पार पडणार आहे. Latest Marathi News

या बैठकीला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. Marathi Tajya Batmya

दरम्यान या बैठकीला ठाकरे गटासोबत युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकरांना मविआमध्ये सामील करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी देखील महाविकास आघाडीत सामिल होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता मविआच्या जागा वाटपाच्या बैठकीला आंबेडकर आल्यास मविआला खुप मोठा फायदा होणार आहे. तसेच मविआची वज्रमुठ देखील अजून घट्ट होवू शकते. Marathi Tajya Batmya

२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जवळपास २०-२५ उमेदवार पडले होते.

वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वंचित मविआमध्ये दाखल झाली तर भाजपचा सुफडा साफ होवू शकतो. राज्यातील प्रमुख चार पक्ष एकत्र आले तर पुन्हा राज्यात मविआचं सरकार येवू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT