prakash Ambedkar & Modi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : मोदींनी स्वपक्षातीलही नेतृत्त्व संपवलं; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

सध्या राष्ट्रीय नेतृत्व करणारं एकही राजकीय नेतृत्त्व नसल्याचे ते म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar : बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातील नेतृत्त संपवल्याचा हल्लाबोल वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, सध्या राष्ट्रीय नेतृत्व करणारं एकही राजकीय नेतृत्त्व नसल्याचे ते म्हणाले. ईडीच्या माध्यमातून देशातलं राजकीय नेतृत्त्व संपण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला.

आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसून, नरेंद्र मोदींचासुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार असल्याचे म्हणत मोदींनीच त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली असल्याचे आंबेडकर म्हणाले. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम असल्याचे त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

पवार आणि आमचं सख्य जगजाहीर

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवारांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत, तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत.

शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती स्वीकारतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी यावेळी व्यक्ती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT