Prakash Ambedkar  
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : आठवडाभरात सरळ भरती सेवा शुल्क कमी करा, अन्यथा...; आंबेडकरांचे 'अल्टीमेटम'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात परीक्षा शुल्क वापरण्यात येतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर अधिवेशनात जोरदार टीका केली होती. आता अनेक पक्षांकडून एमपीएससी स्पर्धा परीक्षा शुल्कावरून आक्रमक भूमिका घेतली जात असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी सरकारला ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरीता निधी जमवण्यासाठी खासगी कंपन्यांचा वापर सरकार करत आहे. सरळ सेवा भरती मार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडून शुल्क वसुली थांबवावी. अन्यथा वंचित बहुजन युथ आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

कायदा मानायचाच नाही असं राज्यात सुरू आहे. आपलं कोण वाकड करणार नाही, असे त्यांना माहीत असते. आज पत्रकाराला मारहाण केली, तरी आरोपींवर कारवाई होत नाही, म्हणजे सरकार भीतीचे वातावरण तयार करत आहे. त्यामुळे लोकांना येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी निर्णय घ्यावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT