Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर स्वबळावरच लढणार? 'एवढ्या' जागांवर उमेदवार ठेवले तयार; म्हणाले, मी वंचित असल्याने...

Vanchit Aaghadi : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र तोडगा निघत नाहीये. दोन दिवसांपूर्वी वंचितकडून २७ जागांवर दावा करण्यात आलेला होता. आता शुक्रवारी प्रकाश आंबेडकरांनी किती जागा निवडून येतील, याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.

संतोष कानडे

Vanchit Bahujan Aaghadi  (Marathi News) : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र तोडगा निघत नाहीये. दोन दिवसांपूर्वी वंचितकडून २७ जागांवर दावा करण्यात आलेला होता. आता शुक्रवारी प्रकाश आंबेडकरांनी किती जागा निवडून येतील, याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.

Prakash Ambedkar Latest News

माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये आम्ही उपरे आहोत, अगोदर त्यांच्यात चर्चा होते नंतर आम्हाला सांगतात. काँग्रेस आणि शिवसेनेचे भांडण संपले की आमचे भांडण संपेल. आम्ही जर स्वतंत्र लढलो तर कमीत कमी सहा जगा जिंकतील अशी परिस्थिती आहे. त्या जागा आज मी सांगणार नाही. कारण त्यामध्ये उद्या वाढ होऊ शकेल.

आंबेडकर पुढे म्हणाले की, आम्ही जर महाविकास आघाडीत गेलो नाही 48 जागा लढण्याच्या तयारीत आहोत. मी आज 10 मार्चपर्यंत 42 जागांवर सभा घेणार असून जेवण देत नसताना गाडी देत नसताना, लोक आमच्याबरोबर किती आले हे दाखवले आहे. अर्ध्या तुटलेल्या पक्षाने स्वतःची ताकद पाहून जागा मागावी, असं म्हणत त्यांनी फुटलेल्या पक्षावर निशाणा साधला.

''नागपूरची जागा वंचितसाठी सोपी आहे. भाजपने पक्ष फोडणे आणि लोक विकत घेण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेहमी 400 जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे. तुम्ही, नेते विकत घ्याल पण मतदार विकत घेणार नाहीत, मतदार जे ठरवतील तेच करतील.''

''मला अधिकृत बायको होता येत असेल तर...''

वंचितच्या 46 उमेदवारांची नावे माझ्याकडे तयार आहेत. घराणेशाही पोसण्यासाठी मी पक्ष उभा केला नाही. मला अधिकृत बायको होता येत असेल तर ठेवलेली बायको कशाला होऊ, अशा शब्दात त्यांनी जागावाटपाबाबत भाष्य केलं. ''मला ज्याच्याशी युती करायची आहे ते उघडपणे करेल'' असंही प्रकाश आंबेडकर शेवटी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ: फायनलमध्ये अहमदाबादची खेळपट्टी कोणाला मदत करणार? समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

UPSC success story : यूट्युबवर ऑनलाईन व्हिडिओ पाहून कोल्हापूरच्या आरुषा पाटीलने युपीएसीमध्ये मिळवलं यश, तुम्हीही म्हणालं...

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Women’s Day Finance Planning: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी टर्म विमा आणि निवृत्ती नियोजन का आवश्यक?

Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?

SCROLL FOR NEXT