prakash ambedkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Satara Crime: "...सोडणार नाही"; दलित महिला मारहाण प्रकरणी आंबेडकरांचा सरकारला इशारा!

अहमदनगर जिल्ह्यातील हरेगावनंतर आता साताऱ्यात जातीय अत्याचाराची अमानुष घटना समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई: समाज कितीही पुढारलेपणाचा आव आणत असला तरी जातीय आणि महिला अत्याचारांच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीएत. काही दिवसांपूर्वीच राज्यात अहमदनगरमधील हरेगाव इथं दलित तरुणांना बेदम मारहाणीच्या घटनेनंतर आता साताऱ्यातील माण इथं एका दलित विधवा महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाणीची संतापजनक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे समन्वय प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. (Prakash Ambedkar warning to Maha govt in Satara case of beating Dalit women)

क्रूर आणि अमानुष

आंबेडकर यांनी म्हटलं की, "साताऱ्यात एका दलित विधवेला ४ पुरुषांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा गुन्हा काय, तर तीनं वैरणीसाठी म्हणजे गुरांच्या चाऱ्यासाठी पैसे दिले होते. पण, चारा न मिळाल्यानं तिचे स्वतःचे पैसे ती परत मागत होती. (Marathi Tajya Batmya)

या कारणामुळं तिला लाथा-बुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ इतका विचलित करणारा आहे की, या जातीय अत्याचाराचं मी वर्णन करु शकत नाही इतकी ही घटना क्रूर आणि अमानुष आहे"

अॅट्रॉसिटी अँतर्गत गुन्हा

"या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काल यासंदर्भात वंचितच्यावतीनं तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे. आजही हा न्यायचा लढा चालू ठेवत आमच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करणार आहोत," असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना इशारा

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देताना "जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही" अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी त्यांना इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT