prasad lad sakal media
महाराष्ट्र बातम्या

सरकारच्या वाईन निर्णयावर प्रसाद लाड म्हणाले,मदिरालये सुरू केली....

चंद्रपूरची दारूबंदी उठवली, मदिरालये सुरू केली; प्रसाद लाड यांचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्य सरकारने (MVA Government) मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन (Wine) विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर सरकारने अध्यादेश काढून घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उठवण्यास सुरु केले आहे. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी जोरदार टीका केली आहे. त्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत टीका केली आहे. (Cabinet approves sale of wine in supermarkets)

प्रसाद लाड म्हणाले, शेतकऱ्यांचे नाव पुढे करून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. यामागचे नेमके धोरणही स्पष्ट करावे!चंद्रपूरची दारूबंदी उठवली, मंदिरे बंद असताना मदिरालये सुरू केली. इथं राज्य सरकार तुपाशी,बाकी सारे उपाशी! 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असा सवालही त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आयात केलेल्या मद्यावरील शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. तसेच आता किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री (Wine Selling) केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT