Afzal khan kabar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pratapgad : शिंदे सरकारचं 'सर्जिकल स्ट्राईक'; अफजलखानाच्या कबरीजवळचं वादग्रस्त बांधकाम पाडले

१९९० पासून यावरुन वाद सुरू होता.

सकाळ डिजिटल टीम

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण कोणत्याही क्षणी काढली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली जात आहे. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता.

अफजलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणं केली जात होती. दर्गा बांधला जात होता. अफजलखानाचं दैवतीकरण केलं जात असल्याचा आरोप १९९० सालीच केला होता. तेव्हापासून हा वाद सुरू होता. याप्रकरणी कोर्टाने २०१७ साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर अद्याप कारवाई झाली होती. अखेर आज ही कारवाई होत आहे. रात्रीपासूनच गुप्तपणे या हालचालींना वेग आला होता. आता ही अतिक्रमणं पाडण्यास सुरुवात होत आहे.

१९८० ते ८५ दरम्यान, या कबरीवर अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली. तिथे उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचं दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती. तसंच या ठिकाणी वनविभागाच्या जागी काही खोल्या बांधण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप आहे. या खोल्यांमध्ये १९९३ च्या बॉम्बस्फोटातले आरोपी राहत असल्याचाही आरोप केला जात होता.

काल रात्रीपासूनच बाहेरील जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त मागवल्याची बातमी आल्याने रात्री अफजलखान कबरीचे अतिक्रमण पाडणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण आले होते. दरम्यान महाबळेश्वर बाजारपेठेतून रात्री पोलीस गाडी फिरल्यामुळे अतिक्रमण प्रतापगडावरचे की बाजारपेठेतले याबाबत महाबळेश्वर करांमध्ये चर्चा सुरू झाली होती. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त वाई मध्ये बोलावण्यात आला होता. सुमारे अठराशे पोलीस काल रात्री दहा वाजेपर्यंत वाईत दाखल झाले होते. सर्व बंदोबस्तावरील पोलिसांची व्यवस्था एका मंगल कार्यालयात केली होती. त्यांनी रात्रीच प्रतापगडाकडे कूच केले आणि आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती. प्रतापगडावर एवढा मोठा बंदोबस्त का तैनात करण्यात येत आहे, याविषयी काल रात्रीच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकली होती. यासंदर्भात काल रात्री सकाळने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र अशा प्रकारे कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! ३५ वर्षांच्या रॅपरने केला ४ वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओलींचा पराभव, बालेंद्र शाह इतिहास रचणार

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर परिसरावर पालिकेची कडक कारवाई

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका वेगवेगळ्या अपघातांत महिलेसह तीन जणांचा मृत्यू

UPSC Result: ट्रक ड्रायव्हरच्या लेकीची उत्तुंग भरारी! उत्तराखंडच्या फातिमाने यूपीएससीत मिळवली ७०८ वी रँक

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी जेलबाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी, नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT