Pravin Darekar  sakal media
महाराष्ट्र बातम्या

ईडीचा सर्वाधिक चुकीचा वापर काँग्रेसच्या काळात, दरेकरांचा हल्लाबोल

केंद्रीय यंत्रणा निपक्षपातीपणे काम करत असतात, त्या जाणिवपूर्वक कोणावरही कारवाई करत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय यंत्रणा निपक्षपातीपणे काम करत असतात, त्या जाणिवपूर्वक कोणावरही कारवाई करत नाहीत

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून नेते, पदाधिकाऱ्यांनी उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले ( Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि ईडीवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे या टीकेला भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar) यांनी उत्तर दिले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही अशा चौकश्यांना सामोरे गेले आहेत. त्यांनी तपास यंत्रणांना प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा साऱ्या तपास यंत्रणांना सामोरे जात प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ज्याला कर नाही त्याला डर असण्याचे काही कारण नाही. अशा प्रकारे आंदोलनाची नौटंकी करून काही साध्य होणार नाही. केंद्रीय यंत्रणा निपक्षपातीपणे काम करत असतात. त्या जाणिवपूर्वक कोणावरही कारवाई करत नाहीत, असंही सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं. ईडीची स्थापना केव्हा झाली. ईडीमार्फत देशात कशा पद्धतीने राजकारण झाले कारवाया झाल्या. याचा पूर्व इतिहास काँग्रेसने तपासून पहावा. आपल्याला ईडीच्या कारवाया जाचक व्हायला लागल्यावर ईडीवर संशय व्यक्त करायचा. त्यांच्यावर टीका करायची. ईडीचा सर्वाधिक चुकीचा वापर काँग्रेसच्या काळात झाला. तपास यंत्रणांचे काम तपास करणे असते. त्यांना काही दोष देण्याचे कारण नाही. ते त्यांच्या कायद्याच्या चौकटीत काम करतात. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांना तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT