pravin darekar esakal
महाराष्ट्र बातम्या

'उत्तर द्यायला अक्कल लागते' दरेकरांचे उपमुख्यमंत्र्यांना उत्तर

बँक चालवायला अक्कल लागते अजित पवारांच्या वक्तव्यावर दरेकरांनी घेतला समाचार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून सर्वच्या सर्व २१ जागांवर बाजी मारणारे भाजप (bjp) नेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांना महाविकासआघाडीने (mahavikas aghadi) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्का दिला. गुरुवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे दरेकर यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला. महाविकासआघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला त्यावर दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारबाबत विविध विषयांवर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.

प्रश्न विचारायला नाही तर उत्तर द्यायला अक्कल लागते.

बँक चालवायला अक्कल लागते अजित पवारांच्या (ajit pawar) वक्तव्यावर दरेकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले आहेत. सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत उपमुख्यमंत्री यांनी बँक चालवायला अक्कल लागते म्हणाले. नारायण राणे यांनी जिल्हा बँक निवडणूक जिंकली याचा अर्थ अक्कल कुठे आहे हे दिसते. वादविवाद निर्माण करण्याचे काम करत आहेत. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रश्न विचारायला नाही तर उत्तर द्यायला अक्कल लागते. असे दरेकर म्हणाले

भूसंपादन मोबदला सरकारने घटवला - दरेकर

सरकार नेमकं कोणासाठी काम करते. बिल्डरांच्या दारू विक्रेत्यांसाठी सरकार काम करते का? शेतकऱ्यांना मोबदला कमी मिळावा यासाठी भूसंपादन किंमत कमी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या विषयी सरकारच्या मनात काय आहे हे स्पष्ट होते..

किरण माने शरद पवार भेटीबद्दल दरेकर म्हणाले..

नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरोधात अनेक सिनेकलाकार बोलत असतात त्यांना कोणी कामावरून काढले का? कोण हा किरण माने ? राजकारण करत इमोशनल स्ट्रेटेजी पुढे केली जात आहे..

संजय राऊत गोवा निवडणूक

संजय राऊत यांचे हे शेवटचे वक्तव्य. काँग्रेस गोव्यात शिवसेनेला विचारायला तयार नाही..संजय राऊत स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत..

On रुपाली पाटील

रुपाली पाटील यांनी अभ्यास करावा. गोव्याच्या आधी त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास करावा..देवेन्द्रजी यांच्यावर टीका करतांना रुपाली पाटील यांना खूप समजून घ्यावे लागेल..असे दरेकर म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

IIT Baba Abhay Singh Story: आयआयटी बाबा अभय सिंहची पत्नी प्रितीका कोण?; ‘युनिव्हर्सिटी’ काढण्याचे स्वप्न, दोघांची भेट पवित्र ठिकाणी

Sinhgad Road News : अंतीम प्रवासावर अंधाराची छाया! वडगावात दुचाकीच्या उजेडात पार पडले अंत्यसंस्कार; मृत्यूनंतरही असुविधांची साथ, नागरिकांचा संताप

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

SCROLL FOR NEXT