Pravin-Darekar sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुंबै बँक घोटाळा | "बरबटलेल्या हातांनी सरकार काय चौकशी करणार?"

मुंबै बँक घोटाळा | "बरबटलेल्या हातांनी सरकार काय चौकशी करणार?"

ओमकार वाबळे

मुंबै बँकेत घोटाळा झाल्याच्या संशयावरून राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी आहेत.

आर्थिक अनियमितता आढळल्याचा ठपका या बँकेवर ठेवण्यात आलाय. बँकेच्या संचालक मंडळाला नोटीस मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यानंतर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित कारवाई सूडबु्द्धीने सुरू असून येणाऱ्या काळात राज्यातील सहकार क्षेत्रातील घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सहकार क्षेत्रातील माफियांची ईडी, केंद्र सरकार, सीबीआयकडे तक्रार करणार आहे, असे दरेकर म्हणाले.

मुंबै बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीच्या व्यक्ती देखील आहेत. एकूण सहा डायरेक्टर असून यामध्ये शिवाजी नलावडे, अभिषेक भुसाळकर, राऊत, तसेच अजित पवारांच्या जवळील काही व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती दरेकरांनी दिली.

आता काही दिवसात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतीस घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढणार आहे, असे दरेकर म्हणाले. या बँकेत शेकडो कोटींचा घोटाळा झाला असून सर्व घोटाळेबाजांची तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT