Kirit-Somaiya sakal
महाराष्ट्र बातम्या

'सोमय्यांचे आरोप हास्यास्पद'; प्रवीण कलमेंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी माझ्या विरोधात आरोप करणारे प्रवीण कलमे (Pravin Kalme) कुठे आहेत? त्यांना सरकारी फायलीतून कागद गपचूप चोरताना पकडण्यात आलं आहे. या गोष्टीला आज पंधरा दिवस झाले. प्रवीण कलमे परदेशात निघून गेल्याचा आरोप करत, त्यांना जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad), अनिल परब (Anil Parab) की मुक्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackaray) यांनी मदत केली का असा आरोप सोमय्या यांनी केला. त्यानंतर प्रवीण कलमे माध्यमांसंमोर येत सोमय्या यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

प्रवीण कलमे यांना १०० कोटी वसूलींचं टार्गेट देण्यात आलं होतं असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केल्यानंतर प्रविण कलमे यांनी, जी व्यक्ती काही दिवसांपुर्वी स्वतः फरार होती ती मला फरार घोषीत करण्याची मागणी करतेय, हे हास्यास्पद आहे, मी कामानिमित्त बाहेर फिरत असतो, मी बऱ्याच दिवसांपासून बाहेर फिरत आहे. माझ्या विरोधात एफआयआर झालीय हे मला किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परीषदेतून कळलं, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मला कळत नाही की एफआयआरची कॉपी सोमय्या यांच्याकडे कशी आली माझ्या एनजीओच्या कामामुळे मला बाहेर फिरत राहवं लागतं, मी माझ्या फोनवर उपलब्ध आहे, इमेलवर उपलब्ध आहे , मग फरार असण्याचं कारण काय आहे. मी परदेशात आहे, ही गोष्ट खरी आहे, ही एफआयआरची प्रत त्यांच्याकडे कशी गेली, हे मुंबई पोलिसांचा भाग कधी झाले? असा सवाल त्यांनी केला.

मी माझं काम संपलं की मी लगेच येणार मला माहिती नव्हतं, मला फोन आलेला नाही मला इमेल आलेला आहे, मला कोणत्याही यंत्रणेनं संपर्क गेला नाही, एफआयआर झाल्याचं मला कळलंच नाही, मी मिडल इस्ट मध्ये आहे, आणि माझं काम झालं की मी मुंबईला परत येईल असे कलमे यांनी सांगितलं.

प्रवीण कलमे हे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वसूलीचे काम करताय असा आरोप सोमय्या यांनी केला होता यावर कलमे यांनी मला वसूलीच्या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, हे माझ्याविरोधात रचलेलं कटकारस्थान असल्याचं कलमे म्हणाले आहेत. किरीट सोमय्या यांच्याविरोधात कारवाई सुरु असल्याचे म्हटले आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी माझा दूरदूरपर्यंत संबंध नाही, त्यांच्याकडे मी तक्रारी करतोय, त्याच्यावर त्यांच्याकडून कारवाई झाली नाही. ते नेमकं कोणाला वाचवतायत हा प्रश्न आहे. ते ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाच्या एफआयआरची कॉपी मला मिळत नाही, ती किरीट सोमय्या यांना मिळते आणि सोमय्या आरोप करतायत की आव्हाड मला वाचवतायत, तर मग जितेंद्र आव्हाड मला वाचवतायत की जितेंद्र आव्हाड आणि सोमय्या एकत्र येऊन त्या विकसकाला वाचवतायत हा प्रश्न आहे, असेही कलमे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: करुणा अन् धनंजय मुंडे यांच्यात न्यायालय करणार मध्यस्थी; म्हणाल्या, ''पुन्हा भेट नको..''

Theur Accident : थेऊरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ९ दुचाकींचा चक्काचूर; चालकावर गुन्हा दाखल!

Unique Amla Candy Recipe: हटके पद्धतीने बनवा इम्युनिटी वाढवणारी आवळा कँडी; आजच ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी!

Solapur Election : तीन उमेदवारांच्या अर्जावरील आपिलाचा निकाल कायम; न्यायालयाने निर्णय अधिकाऱ्यांना दिला पाठिंबा!

Latest Marathi News Live Update: पुण्यात विवाहित महिलेने ९व्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

SCROLL FOR NEXT