Maharashtra Weather Update googel
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता! मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागांमध्ये भागांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर आजपासून राज्यात पुढील 4ते5 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवसांत म्हणाजेच 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर या अवकाळी पावसामुळे शहरातील प्रदुषण काही प्रमाणात कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे. मुंबईत कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यापूर्वी 8 आणि 9 नोव्हेंबरलाही येथे अवकाळी पाऊस झाला होता. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे पालघर परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

आजपासून राज्याच्या दक्षिणकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT