Sanjay Raut, Devendra Fadnavis and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : राऊतांना पुन्हा जेलमध्ये पाठविण्याची तयारी? हक्कभंग समिती नव्याने स्थापण्याच्या हालचाली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. असं वादग्रस्त विधान करणं संजय राऊतांना चांगलचं भोवणार असं चित्र आहे. राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. राऊतांचं हे विधान सत्ताधाऱ्यांना आयतं कोलीत मिळालं असून राऊत यांना पुन्हा कारागृहात पाठविण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. ( Sanjay Raut controversial statement )

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यामध्येच शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळातील घडामोडींना वेग आला आहे. राऊत हे सर्वोच्च सभागृहाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून असे विधान पुन्हा होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान राऊताचं विधान चुकीचं असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील म्हटलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हक्कभंग समिती बरखास्त करून नवीन हक्कभंग समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या समितीसाठी नवीन नावे मागवली आहेत. त्या दृष्टीने घडामोडींना वेग आला आहे. या समितीवर अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांची नावे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT