Ramanath kovind
Ramanath kovind Esakal
महाराष्ट्र

शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा गांधीजीही प्रेरित - राष्ट्रपती

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : किल्ले रायगडाला (Raigad) भेट देणे हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आज किल्ले रायगडाची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो. किल्ले रायगडावर येऊन मला खूप आनंद झाला आहे. खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) छत्रपती यांचे आभार. असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले. खासदार युवराज संभाजीराजे (Sambhaji Raje)छत्रपती यांच्या निमंत्रणानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी (Ramnath Kovind) दुर्गराज रायगडला (Raigad) आज भेट देली.

पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या हिंदवी स्वराज्यापासून गांधीजींही प्रेरित होते. किल्ले रायगडाला भेट देणे हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट देऊन दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशनही केले. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती यांना तलवार भेट दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गडावर आल्यानंतर प्रथम होळीच्या माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. समाधी स्थळावर आपल्या कुटूंबासह जाऊन ते नतमस्तक झाले. यावेळी रायगड प्राधिकरण विकास मार्फ़त सुरू असलेल्या कामाची पाहणी ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT