ramnath-kovind sakal media
महाराष्ट्र बातम्या

संताच्या विचारधारांमुळे महाराष्ट्राची धरती पवित्र - राष्ट्रपती कोविंद

महाराष्ट्राची धरती ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राची धरती ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते

जितकी खुर्ची उंच तितकी जबाबदारी अधिक असते. मी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्यादगडुशेठ हलवाई दत्त मंदिराला शुभेच्छा देतो. अनेकवेळा मी महाराष्ट्रात आलो आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ यांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची धरती पवित्र झाली आह, असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. दत्तमंत्र पठण करत त्यांनी आज पुण्यात भाषणाला सुरुवात केली.

यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी भाष्य केले. ते म्हणाले, मी अनेक वेळा प्रतिभाताई पाटील यांच्याशी बोललो आहे. महाराष्ट्रात मी बऱ्याचवेळा आलो आहे. या राज्याची धरती ही संतांची धरती म्हणून ओळखली जाते. त्यांच्या विचारांनी राज्याची माती पवित्र झाली आहे. मध्यंतरी मला रायगडला जायचं भाग्य लाभलं. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर अनेक शूर मराठा सरदार असतील येथे त्यांचा प्रभाव असल्याने एकजूट राहिली आहे. आजचा पुरस्कर मी राष्ट्रपती कार्यालयाच्या संग्रहालयात ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, पहिली मुलींची शाळाही या राज्यात सुरु झाली. आनंदी गोपाळ या पहिल्या महिला डॉक्टरही महाराष्ट्राच्या होत्या. प्रतिभाताई पाटील यांनीही भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान होऊन महाराष्ट्राची शोभा वाढवली. दगडुशेठ परिवार आणि ट्रस्टचे कौतुक करत ते म्हणाले, त्यांनी या शहराची स्फूर्ती जपून ठेवली आहे त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदर करणार आहे. विदेशातील अनेक सरकारांनी भारतीय लोकांचा सन्मान ठेवला आहे. एकेठिकाणी विदेशात जाण्याचा प्रसंग आला तर त्या ठिकाणी रस्त्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ठेवले आहे. त्याचे लोकार्पणही करण्याची संधी मला मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT