Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? लोकसभेत मतदान केलेल्यांवर अन्याय होण्याची भीती, कोणी केली मागणी?

Maharashtra Politics: सत्ताधाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतादान केलं. त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यांच्या विकासात देखील अडथळा येऊ शकतो आणि भ्रष्ट्रचाराला देखील बढावा मिळू शकतो, असे सुबोध सावजी म्हणाले.

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण राजीनामा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची दिल्लीत बैठक सुरु आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांची भूमिका स्पष्ट करतील.

लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे महायुतीत अंतर्गत कुजबूज सुरु असल्याच्या देखील चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

राष्ट्रपती लागवट लागू करण्याबाबत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांना पत्र लिहले आहे. भाजपने जनसमर्थन गमावलं असून अशा विचारांचे सरकार राज्यात ठेवू नये, अशा विचारांचे सरकार तात्काळ बरखास्त करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सत्ताधाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतादान केलं. त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यांच्या विकासात देखील अडथळा येऊ शकतो आणि भ्रष्ट्रचाराला देखील बढावा मिळू शकतो, असे सुबोध सावजी म्हणाले.  

आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे ते राजीनामा देणार की पदावर कायम राहणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आधीच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल, अशी चर्चा होती. त्यानुसार आता घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. 

गेल्या बुधवारी झालेल्या प्रदेश भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा राजीनामा देऊन पक्षासाठी काम करायचे असल्याचे संकेत दिले होते. गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह फडणवीस समर्थक त्यांना असे पाऊल उचलू नका, असे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारचा राजीनामा देऊन पक्षासाठी काम करायचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 9 जागा जिंकता आल्या, जे 2019 मध्ये जिंकलेल्या जागांपेक्षा 23 कमी आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येऊ शकते, असे फडणवीस यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: ''जेवढी ताकद आहे तेवढी वापरा..'' कोर्टाने दिलेली वेळ संपल्यानंतर बच्चू कडूंची भूमिका

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू स्वतःहून पोलिसांकडे निघाले

अखेर अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कृष्ण रूपाच रहस्य समोर; का घेतलेलं अभिनेत्रीने श्रीकृष्णाचं रूप?

Heart Health Tips: हृदय राहील कायम निरोगी, फक्त जीवनशैलीत करा हे ५ छोटे बदल!

काही असतात सल्लागार तर काहींकडे भविष्य जाणण्याची ताकद ! जन्मनक्षत्रानुसार जाणून घ्या तुमचं Hidden Talent (भाग 1)

SCROLL FOR NEXT