nana patole
nana patole sakal media
महाराष्ट्र

राष्ट्रपती राजवटीच्या भीतीने निवडणूक रद्द? नाना पटोले म्हणतात, 'राज्यपाल...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर अद्यापही विधानसभेला अध्यक्ष मिळालेला नाही. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचं ठाकरे सरकारने ठरवलं होतं. त्यासाठी निवडणुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले होते. आवाजी पद्धतीनं ही निवडणूक घेण्यात येणार होती. पण, राज्यपालांनी ठाकरे सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नियमात केलेले बदल यावर आक्षेप घेतला आहे. तरीही जर निवडणूक घेतली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या भीतीमुळे निवडणूक रद्द करण्यात आली का? या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय.

नाना पटोले यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काही महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रपती राजवट आणि अशा मुद्यांना आमचं सरकार घाबरत नाही. मुद्दा असा आहे की, या आयुधाचा केंद्रामध्ये बसलेलं सरकार दुरुपयोग करत असेल तर ते घातक आहे. भाजपचे आमदार विधानसभेत म्हणतात की, आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करु. त्यांना लोकशाहीची चाडच नाहीये. त्यामुळे भ्रमित झालेल्यांच्या तोंडाला लागायचं नसतं, असं त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलेलं होतं. संध्याकाळी 6 पर्यंत रिप्लाय आला नाही तर होकार गृहित धरु, असं म्हटलं होतं. आज निवडणूक प्रक्रिया सुरू होणार त्या आधी राज्यपाल यांच्या पत्र आलं. या दरम्यान कुठेही त्यांचा अपमान होऊ नये हे आम्ही पाळलं. नियमानुसार कायद्यात दुरुस्ती केल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

गांधीदूत कॅम्पेनचं लाँचिंग

आज नाना पटोलेंनी गांधीदूत कॅम्पेनचंही लाँचिंग केलं. विषारी विचारात लोक जाऊ नये आणि वास्तविक विचारांची माहिती आमच्या कॅम्पेनमधून देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.कालीचारणसारखे लोक गांधीजींना शिव्या घालतात. हिंदुवादी लोकांच्या माध्यमातून गांधीजींना अपमानित केलं जातं आहे. या विचाराला डावलण्याची गरज आहे. त्यासाठी 10000 गांधीदूत आम्ही निर्माम करत आहोत. जिथे विषारी विचार टाकण्याचा प्रयत्न होईल तिथे आम्ही कार्यरत असणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: "इस्लाम हा एक न्याय्य धर्म, तो समाजावर लादला पाहिजे..." विद्यार्थ्याच्या खळबळजनक विधानामुळे सोशल मीडिया पेटले

X Overpayment Issue : इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांचा पगार मागितला परत; कोट्यवधींच्या रक्कमेसाठी काढली नोटीस,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT