solapur police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहर पोलिस दलातील ‘या’ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक; मुळेगावातील ‘या’ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचाही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

सलग ३६ वर्षे उत्कृष्ट पोलिस सेवा बजावल्याबद्दल सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. दुसरीकडे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेतील उपनिरीक्षक राजकुमार तोळनुरे यांनाही राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सलग ३६ वर्षे उत्कृष्ट पोलिस सेवा बजावल्याबद्दल सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. दुसरीकडे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेतील उपनिरीक्षक राजकुमार तोळनुरे यांनाही राष्ट्रपती पदक मिळाले आहे.

पोलिस निरीक्षक श्री. वाघमारे यांनी पोलिस दलात ३६ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या या कार्यकाळात त्यांना तब्बल २५६ बक्षीसे मिळाली आहेत. २०२३ मध्ये त्यांना पोलिस महासंचालक पदक मिळाले होते. त्यांनी आतापर्यंत पुणे शहर, नागपूर शहर, छत्रपती संभाजी नगर सीआयडी, २०११ मध्ये सोलापूर ग्रामीण (करमाळा) आणि आता सोलापूर शहरात कार्यरत आहेत.

तसेच २५ ऑगस्ट १९९२ मध्ये पोलिस सेवेत दाखल झालेले राजकुमार तोळनुरे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल आतापर्यंत तब्बल ५१२ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना १ मे २०१८ रोजी उत्कृष्ट पोलिस सेवेबद्दल पोलिस महासंचालक चिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत पोलिस मुख्यालय, जेलरोड, सदर बझार, फौजदार चावडी, विजापूर नाका या पोलिस ठाण्यांमध्ये आणि गुन्हे शाखेतही काम केले आहे. आता ते सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. सोलापूर शहर पोलिस दलातील दोघांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सोलापूरच्या गोविंद राठोड यांनाही पदक

नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अतिरिक्त अधीक्षक म्हणून गोविंद केशव राठोड कार्यरत आहेत. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे. ते मूळचे मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातच झाले आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये ते पोलिस सेवेत दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT