महाराष्ट्र बातम्या

PM Modi : पंतप्रधानांचा नवी मुंबई दौरा; 'या' कार्यक्रमासाठी मोदी राहणार उपस्थित

संतोष कानडे

मुंबईः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्य सरकारच्या वतीने आयोजित कार्यक्रम आणि मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते येत असल्याची माहिती मिळत आहे.

नवी मुंबई मेट्रोचा ११ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झालेला आहे. मागील अनेक दिवसांपासून मेट्रोचा शुभारंभ प्रतीक्षेत असून पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल, असं सांगितलं जात आहे. तसेच राज्य सरकारच्या नारीशक्ती सन्मान योजनेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण व्हावं, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा होती, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मोदींचा दौरा निश्चित होईल, असं सांगितलं जात आहे. खारघर सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांच्याच दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाची एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रशासनाकडून अधिकृतरित्या दौऱ्याची माहिती देण्यात येईल. त्यानंतरच नेमका दौरा कधी होणार, हे स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Dhamangaon Blaze: धामणगाव विद्यामंदिरला भीषण आग: ३०-४० घरे राख, लाखोंचे नुकसान; जीवितहानी टळली तरी ग्रामस्थ बेघर

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

ST Bus Fire : मंचरजवळ पेठ घाटात धावत्या एसटीला अचानक आग

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT