pritam munde news 
महाराष्ट्र बातम्या

Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनात प्रीतम मुंडेंचा केंद्र सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या...

Sandip Kapde

ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी विरोध सुरूच ठेवला आहे. 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे देशभरातून केंद्र सरकारवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.

कुस्तीपटूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहीजे. दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नाही, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

महिलेची अशाप्रकारे तक्रार येते तर त्याची दखल घेतली पाहीजे. योग्य चौकशी करुन निर्णय द्यायला पाहीजे. मात्र ही दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नाही आहे, मला महिला म्हणून वाटत की त्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला हवी, असे प्रतीम मुंडे म्हणाल्या.

राज ठाकरेंचे मोदींना पत्र!

राज ठाकरे म्हणाले, "आज तुमचं (नरेंद्र मोदी) एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणास हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती."

"ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही 'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT