Prithviraj Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

पटोलेंनी चव्हाणांना भरवला केक, विधानसभा अध्यक्षपदावरून चर्चांना उधाण

ओमकार वाबळे

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सध्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होईल. मात्र, पूर्णवेळ अध्यक्ष देण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. यासाठी भाजपने आमदारांचा व्हिप जारी केलाय. अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा असल्याने काँग्रेसमधूनच नेत्याची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र, अद्याप नावाची घोषणा झालेली नाही. नाना पटोले (Nana Patole) यांनी अधिवेशनाआधी दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर राहुल गांधी संबंधित विषयात लक्ष्य घालून हाय कमांडने दिलेला निर्णय मान्य करणार असल्याचं सांगितलं. पण याआधी नाना पटोले यांनी काही सूचक वक्तव्य केली आहेत. (Nana Patole speaks on Prithviraj Chavan)

विधानसभेच्या अध्यक्षपदावर (Vidhansabha Adhyaksh) पृथ्वीराज चव्हाण किंवा संग्राम थोपटे यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा आहेत. याव्यतिरिक्त कोणाकडे अध्यक्षपद जाणार का, असा प्रश्नही काहीजण विचारत आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात नाना पटोले यांनी पृथ्वाराज चव्हाणांना केक भरवला. यानंतर अध्यक्षपदाची माळ चव्हाणांच्या गळ्यात पडण्यावरून चर्चा सुरू झाल्या. त्यातच नाना पटोले यांना मंत्रीपद मिळणार असल्यचं बोललं जातंय. नितीन राऊत यांच्या ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार त्यांना मिळणार असल्याचे वृत्त आहे.

अखेर नाना पटोलेंनी यावर स्पष्टीकरण दिलं. विधानसभा अध्यक्षपदाबाबत सर्व निर्णय हायकमांड घेणार असल्याचं ते बोलले. आणि मंत्रीपद मला मिळालं, तरी ऊर्जामंत्री होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AFG A, ODI: भारतीय अ संघाचा उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा! १०१ धावांनी विजयासह ठोकली फायनलसाठी दावेदारी, समीकरण घ्या जाणून

Inspector Zende to Governor: रिअल लाईफ स्टोरीजवर बनलेत 'हे' ६ जबरदस्त शो; थ्रिलर आवडत असेल तर आत्ताच वाचा!

Mumbai News: ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत! मुंबईत नवा उड्डाणपूल खुलणार, कुठे आणि कधीपासून?

हिंदी मालिकेत रोमान्सच्या नावाखाली मारहाण; प्रेक्षक संतापले; मराठीत बनलाय त्याच मालिकेचा रिमेक, इथेही तेच दाखवणार?

Bandhavgad Tiger: वाघ पाहायचाय? मग बांधवगडला नक्की जा! २००० वर्षांचा किल्ला, जंगल सफारी आणि आता राष्ट्रीय पुरस्काराचीही शान

SCROLL FOR NEXT